निघून ज़ाईन मी
ओलेत्या वाटांवरून
आलो तसा
तुला शोधत
किती वाट पाहायची
टेकडीच्या माथ्यावर
अज़ून ढगांचा ओला वास तसाच आहे
माझ्यापाशी,
ह्या डोंगर पठारावरल्या
गवत फुलानंही तुझाच घोशा लावलाय
तुला कसं वागावं हे कळत नाही
आणि मला तर नाहीच नाही
मी सुद्ध निघून ज़ायला पहिजे होतं एव्हाना
तू आला नहीस म्हणून
पण का कुणास ठाऊक
पाऊल उचलेच ना
वेडेपणाच सगळा
- लक्ष्मीकांत
© Laxmikant G. Bongale
This content is restricted to the “melaxmikant.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same.
1 comment:
टेकडीच्या माथ्यावर
रेलून थांबलेली शुभ्र स्वप्ने,
फुलत असतात लाव्हा फुटल्यासारखी,
त्यांच्यातल्या तेजाळ पटलांना
उगीच गोलाकार आकार येतात.
परिघे अस्पष्ट होतात,
मंदपणे नवे कापूस येते आतून.
पांघरता येत नाहीत नजरेला ते ढग,
ती अर्ध-वर्तुळे त्यांच्या तरल पारदर्शक पदरांसहित.
बहुदा आपल्या नकळत आपण शोधत असतो
त्या पुंजक्या-मध्ये
मोगलकालीन चित्रामधल्या स्पष्ट अर्ध-वक्र रेखा,
(जोडीला तसेच शुभ्र कबुतर देखील!)
अश्यावेळी, नेमक्या अश्यावेळी
ती स्वप्ने कोणती म्हणून
खांद्यावर परिचित हात पडतो,
तू भेटल्याची स्पष्ट जाणीव होते,
असे नेहमीच न भेटण्यासाठी मी कितीदा बजावत
असतो तुला, तुझ्याही एकांतात मी
मलाच शोधत असतो हे कसे समजत नाही तुला?
वारा सुटू लागताच मेघ पसरू लागेल.
झाकोळून गेलेला तो नसलेला
लाव्हा ठिणगीएवढा तरी दिसेल
ही भीती अबाधित ठेवण्यासाठी
तुला निरोप द्यायला मी वळतो
मघाशी येताना डोळ्यात साठवलेली
गवतफुले तुडवत
मी टेकडी उतरू लागतो.
पलीकडून रंगांचा शिडकावा
ढगामध्ये पाझरत जात असताना,
टेकडीचा उतार अधिक तीव्र भासल्यावर
"वेडेपणाच सगळा"
हे उद्गारण्या इतका मी वेडा नाही;
हे तू मागून माझ्याकडे हसत पाहताना
तुला कळत असते, ठाऊक आहे ते.
Post a Comment